Sunday, September 26, 2010

वुलडोझर प्रश्स्ती: सचिन केतकर

बरं झालं देवा
जंगलं उरलीच नाहीत
ह्या भूतलावर
नाहीतर आजही फ़िरत असते
झाडांच्या स्मशानावर
महाकाय  बुलंडोझरांची भूतावळ


बरं झालं देवा
आदीवासी उरलेच नाहीत
ह्या भूतलावर
नाहीतर आजही त्यांच्या आरोळ्यांवरून
फ़िरत राहीले असते
पोलादी महाचक्रांचे बुलडोझर


बरं झालं देवा
उरल्याच नाहीत बायका
ह्या भूतलावर
नाहीतर आजही त्यांना चेंगरत
फ़िरत राहीले असते
हे प्रचंड पुरषी बुलडोझर


बरं झालं देवा
लहान लहान कोवळी मुलच उरलीच नाहीत
ह्या भूतलावर
नाहीतर आजही त्यांच्या निरागसपणावर
फ़िरत राहीले असते
प्रौढ पिशाची बुलडोझर


बरं झालं देवा
उरलीच नाही भाषा
ह्या भूतलावर


(अप्रकाशित) 

No comments:

Post a Comment