Monday, September 27, 2010

स्वताःच्या श्राध्दाची कथा: सचिन केतकर

एका काळवंडलेल्या संध्याकाळी


काळ्याकुट्ट शब्दांचे
सतराशे साठ कावळे
माझ्या कौलारू छ्तावर
टव्ही ऍन्टॅनावर


मी धरलं त्याना 
माझ्या कवितेचं पींड


एक एक शीत घेऊन 
त्यांच्या उदास चोचीत


मूकाट्याने निघून गेले
ते आप आपल्या घरी

(जरासंधाच्या ब्लॊगवरचे काही अंश मधून)

No comments:

Post a Comment